rashifal-2026

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2017 (12:34 IST)
185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात पीएनजी ज्वेलर्स मंगळसूत्रांची एक्‍सक्‍लुझिव्ह श्रेणी सादर करणार आहे.
 
आजच्या काळात भारतीय विवाहित महिला पारंपरिक तसेच आधुनिक दागिना असलेले मंगळसूत्र वापरतात. हा दागिना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र हे स्त्रीचे प्रेमाचे , विवाहित असल्याचे प्रतीक असून ते स्त्रीमधील एकनिष्ठता, आत्मविश्वास दर्शविते.
      
यंदाच्या वर्षी प्रामुख्याने मंगळसूत्रांचे प्रकार वजनाला हलके त्याचबरोबर पारंपरिक डिझाईन्स सुध्दा असणार आहेत.
 
या महोत्सवकाळात भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये आकर्षक अशा वैविध्यपूर्ण नवीन डिझाईन्स पाहायला मिळतील. या आकर्षक योजनेअंतर्गत डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या घडणावळीवर फ्लॅट 70 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर 30 टक्के पर्यंत सवलत देण्यात येणार आहे.                          
 
याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, मंगळसूत्र महोत्सव हा नेहमीच भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये लक्षणीय महोत्सव ठरला आहे. हा पीएनजी ज्वेलर्स प्रस्थापित वार्षिक उपक्रम आहे. या महोत्सवात आम्हास नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेता नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाईन्स सादर करत असतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: नगरसेवकांमध्ये पक्षांतर होण्याची शक्यता नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला

नाना पटोले यांचा दावा: "तरुण पंतप्रधानांची गरज आहे"

सिमेंट कंपनीला दिलेली एनओसी रद्द करण्याची मागणी, २२ तारखेला रस्ता रोको आंदोलन

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

पुढील लेख
Show comments