Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी सरकारद्वारे एजेंसीची मदत घेण्यात येईल. योग्य आकलन झाल्यावरच जप्त डामयंड्सची खरी काय ती किंमत माहीत पडेल.
 
गीतांजली ग्रुपचे नीरव मोदी आणि मेहुल चोकसी ग्राहकांना किती चुना लावत होते हे ईडीला कळून आले. ते कमी दर्ज्याची डायमंड ज्वेलरी 4 ते 5 पट अधिक किमतीवर विकायचे. अनेकदा गौण गुणवत्ता असलेल्या डायमंडचा भाव 10 पट अधिक वसुली केला जाता होता. खर्‍या किमतीहून दहा पट अधिक किमतीचे टॅग लावून ते विकले जात असे.
 
हैदराबाद येथून करण्यात आलेल्या जप्तीची किंमत 48 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. यानंतर मुंबई आणि सूरत येथून जप्ती करण्यात आली. अनेक जागेहून जप्त केल्या गेल्या सामानाची किंमत 100 कोटी समोर आली परंतू त्याची खरी किंमत 25 कोटी अशीच होती.
 
नीरवच्या वकिलांप्रमाणे तर हे पूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करण्यात आले आहे. हे प्रकरण गाजवण्यात येत असून नीरव सध्या व्यवसायच्या कामानिमित्त परदेशात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याप्रमाणे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाहीये. मीडियाप्रमाणे ईडीने 5600 कोटी रुपये जप्त केले अर्थात रक्कम वसूल झालेली आहे तर ती रक्कम पीएनबीला देऊन द्याला हवी. यापूर्वी नीरव यांनी स्वत: आपला पक्ष मांडत पंजाब नॅशनल बँकेला यासंदर्भात पत्र लिहिले. त्यात नीरव यांनी म्हटले की बँकेने हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे त्यांच्या इमेज व व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे ते रक्कम वापस करणार नाही.
 
तसेच नीरवने लिहिले की त्यांच्यावर रक्कम वाढवून दर्शवली गेली आहे आणि शिल्लक रक्कम 5000 कोटीहून कमी आहे. एवढी मोठी रक्कम ते चुकवू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च