Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी देशभरात आक्रमक १६ राज्यांत केली जोरदार आंदोलने

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी देशभरात आक्रमक १६ राज्यांत केली जोरदार आंदोलने
कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्याने वाढले आहेत. सलग दहाव्या दिवसानंतरही हे दर वाढतच आहेत. पेट्रोलचे दर शंभरचा आकडा पार करतात की काय अशी भीती सामान्य नागरिकांना वाटू लागली आहे. सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे. सरकारने योग्य धोरण राबवले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या दरवाढीविरोधात देशभरात आक्रमक पवित्रा घेतला. २४ मे रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देशभरात १६ राज्यांमध्ये आंदोलने केली.
 
या आंदोलनादरम्यान विद्यार्थी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळेही जाळण्यात आले. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरील एक आव्हान आहे. पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. जोपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलनं थांबणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेट्रोलच्या दाराच्या भडक्याने महाराष्ट्रातील जनता त्रस्त, अमरावतीत देशातील विक्रमी दर