Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला, नवीन स्मार्ट टीव्ही घेऊया, वनप्लसकडून तीन टीव्ही लाँच

Webdunia
शुक्रवार, 3 जुलै 2020 (09:39 IST)
वनप्लसने भारतात तीन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केल्या आहेत. या टीव्हींच्या किंमती १२,९९९ रुपयांपासून सुरू होतात. आता कंपनी आपल्या स्वस्त स्मार्ट टीव्हीद्वारे शाओमी आणि रियलमीला भारतात टक्कर देत आहे. वनप्लस टीव्ही यू१, वनप्लस टीव्ही वाय-सीरिज, वनप्लस टीव्ही ४-सीरिज अशा तीन व्हेरिएंट्समध्ये टीव्ही लाँच केल्या आहेत.
 
व्हेरिएंट्स आणि किंमत
वनप्लस टीव्ही यू१, ५५ इंची किंमत 49,999 रुपये आहे.
 
वनप्लस टीव्ही वाय-सीरिज, ३२ इंची किंमत १२,९९९ रुपये आहे.
 
वनप्लस टीव्ही ४-सीरिज, ४३ इंची किंमत २२,९९९ रुपये आहे.
 
वनप्लस टीव्ही यू १ मध्ये वनप्लस सिनेमॅटिक डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय, 4K रिझोल्यूशन देण्यात आला आहे. यामध्ये ९० टक्के डीसीआय पी३ देण्यात आला आहे आणि कंपनीने गामा इंजिन देखील वापरलं आहे. या टीव्हीला डॉल्बी व्हिजन देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी कंपनीने त्यात 30W उच्च दर्जाचे स्पीकर्स वापरले आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे. वनप्लसच्या नवीन टीव्ही रेंजमध्ये HDR 10, HDR 10+ आणि HLG सपोर्ट देण्यात आला आहे. त्यात गामा इंजिन देण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments