Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातुरला दुष्काळात रेल्वेने दिलेल्या पाण्याचे बिल माहीत आहे का ?

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:48 IST)
स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा असलेल्या लातूरमध्ये, दुष्कळात पिण्याचे पाण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. त्यामुळे लातूरला पिण्यासाठीही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सांगली जिल्हयातील मिरजहून रेल्वेने पाणी पुरवण्यात आले होते, आज हि लातूरमध्ये दुष्काळी स्थिती कायम आहे. त्यामध्ये आता केंद्रीय  रेल्वे मंत्रालयाने लातूर महापालिकेला मोठा आर्थिक धक्का दिला आहे. रेल्वेने मनपाला पत्र पाठवून नऊ कोटी रुपये बिल थकीत असल्याचं नमूद केले आहे. हे कोट्यवधी रुपयांचे थकीत बिल भरण्याची मागणी करण्यात आल्यामुळे लातूर महापालिकेसमोरच्या मोठी अडचण निर्माण केली आहे. लातूरला 2016 मध्ये रेल्वेने पाणी पुरवठा केला होता. मिरज येथून दररोज 25 लाख लिटर पाणी लातूरकरांसाठी पाठवण्यात आले, तर रेल्वेच्या टँकरने तब्ब्ल 111 फेऱ्यांमधून 25 कोटी 95 लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला होता. हे पाणी आम्ही सामाजिक भावनेने पाणी देत आहोत, त्याचा कसलाही मोबदला आम्ही मागणार नाही, असं रेल्वेच्या वतीने त्यावेळी भूमिका घेतली होती. 
 
नंतर मात्र रेल्वेने लातूर महापालिकेला नऊ कोटींच्या थकीत बिल मागणी करणारं पत्र पाठवलं. त्यावर राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तोडगा काढत हे बिल महापालिकेकडून घेऊ नये असं कळवण्यात आल. पण आता बिल भरण्याची मागणी रेल्वेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच दुष्काळ, न महसुलाचे कोणते साधन व आर्थिक बिकट स्थिती असलेल्या लातूर मनपा कसे पैसे उभा करणार हा मोठा प्रश्न आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments