Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही तर फक्त अफवा, आरबीआयचे स्पष्टीकरण

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2017 (11:13 IST)
बँक ऑफ इंडियासह 9 बँकांवर केलेल्या कारवाईबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. आरबीआयने केलेल्या तातडीच्या सुधारणेच्या कारवाईमुळे (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन) या बँकांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे  या पार्श्वभूमीवर या सर्व बँका बंद होणार आहेत, अशा बातम्या सोशल मीडियात पसरल्या होत्या. त्याची दखल घेत रिझर्व्ह बँकेने कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हायरल होत असलेल्या बातम्या निव्वळ निराधार असल्याचं आरबीआयने सांगितलं.
 
याआधी बँक ऑफ इंडियासह आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक, कार्पोरेशन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे.

प्रॉम्प करेक्टिव्ह अॅक्शन घेतली जात असताना बँकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचललं जातं. त्याचा ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही, असंही आरबीआयने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: शीतल देवरुखकर-शेठ यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमधील दोन आयुष्मान आरोग्य मंदिरांना NQAS प्रमाणपत्र मिळाले

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

नाशिक महानगरपालिका निवडणूक: 2356 पैकी 277 अर्ज रद्द, 2079 उमेदवार रिंगणात

नवीन वर्षात उद्धव-राज भेट, राजकारणात एक नवी खळबळ

पुढील लेख
Show comments