Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसबीआय अलर्ट आज योनो, इंटरनेट बँकिंग, यूपीआय काम करणार नाही

एसबीआय अलर्ट आज योनो, इंटरनेट बँकिंग, यूपीआय काम करणार नाही
, शुक्रवार, 7 मे 2021 (10:35 IST)
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारी संध्याकाळी एसबीआयच्या डिजीटल सेवांवर परिणाम होणार आहे. यामागचे कारण म्हणजे बँकेचे डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म सुधारण्याचे प्रस्तावित काम. मागील महिन्यात देखभाल संबंधित कामांमुळे योनो, योनो लाइट, इंटरनेट बँकिंग, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) यांच्यासह बँकेचे डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म प्रभावित झाले होते.
 
एसबीआयने गुरुवारी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही 7 मे 2021 रोजी रात्री 10.15 ते 8 मे 2021 रोजी रात्री 1.15 या वेळेत देखभाल संबंधित काम करू. यावेळी, आयएनबी / योनो / योनो लाइट / यूपीआय सेवा उपलब्ध होणार नाहीत. ग्राहकांना होणार्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आपणास सहकार्य करण्याचे आवाहन करतो.
 
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या 22,000 हून अधिक शाखा आणि 57,889 एटीएम आहेत. 31 डिसेंबर 2020 पर्यंत इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे 8.5 कोटी आणि 1.9 कोटी आहे. त्याच वेळी, बँकेच्या यूपीआय वापरणार्या ग्राहकांची संख्या 135 दशलक्ष आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार