rashifal-2026

एसबीआय कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के कपात

Webdunia
सोमवार, 3 एप्रिल 2017 (22:25 IST)

स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के इतकी कपात केली असून प्रमाण व्याजदर 9.10 टक्के केला आहे.  यामुळे वाहन कर्जे व गृहकर्जासारखी कर्जे स्वस्त होतील आणि आधीच्या कर्जदारांचाही हप्ता कमी होईल अशी आशा आहे. या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेची ही व्याजदर कपात सूचक मानण्यात येत आहे. स्टेट बँकेचा कर्ज देण्यासाठी असलेला आधार दर किंवा प्रमाण दर 9.25 टक्के होता जो आता 1 एप्रिलपासून 9.10 टक्के झाला आहे. प्रमाणदरात कपात केल्यामुळे या आधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांनाही व्याजदर कपातीचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने पाच सहयोगी बँका व भारतीय महिला बँक स्वतात विलीन केल्यामुळे जगातल्या टॉप 50 बड्या बँकांमधली एक झाली आहे. स्टेट बँकेची ग्राहक संख्या 37 कोटी झाली असून एकूण 24 हजार शाखा आणि 59 हजार एटीएमच्या नेटवर्कचे जाळे देशभरात आहे. एकत्रीकरणानंतर बँकेच्या ठेवी 26 लाख कोटी असून 18.50 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेने आपल्या लोगोमध्येही  बदल केले आहेत.

 
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

दक्षिण स्पेनमध्ये मोठा अपघात, दोन हायस्पीड ट्रेनची धडक, 21 जणांचा मृत्यू

LIVE: आम्ही भाजपसोबत जिंकलो, आम्ही त्यांच्यासोबतच राहू… शिंदे गटाने स्पष्ट केले

26 जानेवारीपासूनमुंबई उपनगरीय विभागात 12 नवीन एसी लोकल ट्रेन रुळांवर धावणार

IND vs NZ: न्यूझीलंडने 38 वर्षांत पहिल्यांदाच भारतात एकदिवसीय मालिका जिंकली

ट्रम्प यांनी पाकिस्तानसह शाहबाज शरीफ यांना शांतता मंडळात सामील होण्यासाठी आमंत्रित केले

पुढील लेख
Show comments