Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स
, मंगळवार, 19 जून 2018 (15:14 IST)
खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करीता अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी काही ऑफर्स आणल्या आहेत. अॅपल कंपनीने विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार मॅकबुक आणले आहे. या मॅकबुकवर 16,000 रुपयांपर्यंतची सूट ठेवली आहे. खरेदीसाठी सिटी बॅंकचे क्रेडिड कार्ड वापरल्यास 10,000 रुपयांची अॅडिशनल कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅकची ऑफर मॅकबुक एअर सुद्धा मिळणार आहे. 
 
 
फ्लिपकार्टवर विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवर लॅपटॉप खरेदीसाठी नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर ही ऑफर 19 ते 21 जूनपर्यंत आहे. या ऑफरमध्ये विद्यार्थ्यांना अॅपलचे आयपॅड प्रो खरेदीवर 7,400 रुपयांची आणि मॅकबुकवर 9,000 रुपयांची सूट मिळणार आहे. अॅपल आयमॅक आणि मॅकबुक प्रो खरेदीवर सुद्धा ही ऑफर सुरु आहे. आयमॅकवर 13,700 रुपयांची सूट मिळणार आहे, तर मॅकबुक प्रो यावर 16,000 रुपयांची सवलत मिळणार आहे.
 
याशिवाय फ्लिपकार्टवर डेलच्या इन्सपिरॉन 3467, 5567 आणि एचपीच्या HP 15 BU105TX या लॅपटॉपवर ही ऑफर आहे. आसुस आणि लिनोवोच्या लॅपटॉप खरेदीवर सुद्धा ही ऑफर आहे. आसुसच्या X541UA-XO561T आणि लिनोवोच्या IP 320E लॅपटॉप ही ऑफर आहे. तसेच, तुम्ही जर लॅपटॉप एक्सचेंज करत असाल, तर फ्लिपकार्टवर मुख्य ऑफरशिवाय 3,000 रुपयांची जादा सूट मिळणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रेनला उशीर झाला, मग IRCTC कडून जेवण मोफत