इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे. वर्ष २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परतावा दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष२०१७-२०१८ मध्ये तीन महिने व्हॅट कायदा व ९ महिने जीएसटी कायदा लागू होता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल आणि इतर माहिती टॅक्स रिटर्नमध्ये द्यायची गरज नव्हती, परंतु आता शासनाने टॅक्स रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगण्यात आले आहे.