Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता या 10 जागी PAN ऐवजी देऊ शकता Aadhar नंबर

Webdunia
PAN कार्ड कुठे-कुठे वापरायचं यावर अजून ही लोकं गोंधळतात. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्डाला अनेक जागी जोडले आहे ज्याने ट्रांझेक्शन करणे सोपे जाईल. जाणून घ्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड कुठे वापरता येईल.
 
अर्थसंकल्प 2019 मध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड संबंधित काही नियमात बदल झाले आहे. कॅश काढणे, कॅश जमा करणे, ITR फाइलिंग आणि इतर. सरकार डिजीटल ट्रांझेक्शनला प्रोत्साहन देत आहे ज्याने पारदर्शिता वाढेल. अशात पॅन कार्ड संबंधित काही नियम बदलण्यात आले आहे.
 
करदात्यांना दिलासा देत बजेटमध्ये घोषणा केली गेली की ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही ते आधार नंबरद्वारे टॅक्स रिटर्न फाइल करू शकतात.
 
पूर्वी 50 हजार रुपयांच्या कॅश ट्रांझेक्शनवर पॅन कार्ड नंबर देणे अनिवार्य होतं परंतू आता या प्रकाराच्या व्यवहारासाठी PAN नंबर नसल्यावर आधार नंबर देता येईल. बँकेत 50 हजार रुपयाहून अधिक कॅश जमा केल्यास आधार नंबरद्वारे देखील व्यवहार करता येईल.
 
2 लाख रुपयांहून अधिक किमतीचं सोनं खरेदी केल्यावर ज्वेलरला आपलं पॅन कार्ड द्यावं लागत होतं आता येथे देखील आधार नंबर देता येऊ शकतो.
 
कार खरेदी करताना पॅन कार्ड नंबर देणे अनिवार्य होतं पण आता आधार नंबर देता येईल.
 
सगळ्या बँक क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी ग्राहकांकडून पॅन कार्ड मागतात परंतू आता आपल्याकडे पॅन कार्ड नसल्यास आपण आधार नंबर देऊ शकता.
 
हॉटेलमध्ये बिल पेमेंट करताना आपलं बिल 50 हजार रुपयाहून अधिक झाल्यास आपण कॅश पेमेंट करू इच्छित असल्यास पॅन नंबरऐवजी आधार नंबर देऊ शकता. या प्रकारे परदेश प्रवास करताना देखील 50 हजारापेक्षा अधिक कॅश खर्च झाल्यावर आपण आधार नंबर देऊ शकता.
 
नियमांप्रमाणे इंश्योरेंस कंपनीचा प्रिमियम एका वर्षात 50 हजाराहून अधिक झाल्यावर पॅन नंबर द्यावा लागतो परंतू आता आधार नंबर देता येईल.
 
लिस्टेड नसलेल्या कंपनीचे 1 लाख रुपायाहून अधिकाचे शेअर खरेदी केल्यावर देखील आधार नंबर देता येईल.
 
नवीन नियमांप्रमाणे आता 10 लाख रुपयांहून अधिक महाग प्रापर्टी खरेदी केल्यावर पॅनऐवजी आधार नंबर देता येऊ शकतो.
 
सरकाराचे फायनेंस बिल प्रभावी झाल्यावर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आणि शेअर्सची खरेदी विक्रीमध्ये देखील पॅन कार्डाऐवजी आधार नंबर देता येईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments