Marathi Biodata Maker

कारमध्ये बसा आणि महिना 3 लाख कमवा

Webdunia
केवळ कारमध्ये बसण्यासाठी दर तासाला 1300 रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी गुगलने देऊ केली आहे. मात्र ती फक्त अँरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे गुगल त्यांच्या सेल्फड्रीव्हन कारच्या चाचण्या या भागात घेत आहे. 
 
त्यासाठी त्यांनी पदवीधरांकडून अर्ज मागविले आहेत. काम इतकेच की निवड झालेल्या उमेदवारांनी या कारमध्ये बसायचे आणि तासाला 20 डॉलर्सप्रमाणे मेहनताना घ्यायचा. कामाचे तास आहेत 6 किवा 8. म्हणजे आठ तास काम केले तर महिन्याला 3 लाख रूपये पगार. 
 
अर्थात त्यासाठी कांही अटी आहेत. म्हणजे इच्छुक उमेदवार पदवीधर हवा तसेच त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड असता कामा नये. प्रतिमिनिट 40 शब्द या वेगाने टायपिंग करता यायला हवे व निवड झाल्यास 12 ते 24 महिन्यांचा करार त्याला करावा लागेल. ही कार आपोआप चालणारीच आहे पण समजा मध्येच कांही गडबड झाली तर सीटवर बसलेल्या या उमेदवाराने कार सांभाळायची आहे. 
 
प्रत्येक सेशनचा लिखित व तोंडी फिडबॅक कंपनीला द्यायचा आहे. त्यानुसार कारमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. गुगल त्यांचा सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकही या वर्षअखेर अमेरिकेत वापरात आणणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

दक्षिण आफ्रिकेत चार मजली हिंदू मंदिर कोसळले; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

LIVE: विधानभवनात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय संघर्ष तीव्र

लिओनेल मेस्सीचं भारतात आगमन!

नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली

अपंग उमेदवारांना आता यूपीएससी परीक्षेत त्यांच्या पसंतीचे केंद्र निवडता येईल

पुढील लेख
Show comments