नवी दिल्ली- पेट्रोल एक रुपय; तर डिझेल दोन रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)ने ही माहिती दिली.
जुलैपासूनची ही चौथी दरकपात आहे. यापूर्वी 1 ऑगस्टला पेट्रोलमध्ये एक रुपया 42 पैशांची; तर डिझेलमध्ये दोन रुपये एका पैशाची कपात करण्यात आली होती. येथे मध्यरात्रीपासून लागू झालेल्या दरानुसार पेट्रोल आता 60 रुपये नऊ पैशांनी; तर डिझेल 50 रुपये 27 पैसे प्रतिलिटर मिळेल. यापूर्वी हे दर अनुक्रमे 61 रुपये नऊ पैसे व 52 रुपये 27 पैसे होते.