Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंकुश ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता

Webdunia
शनिवार, 5 डिसेंबर 2015 (15:20 IST)
आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला महाराष्ट्राची लोकधारा आणि एकांकिकांमधून सुरुवात करणार्‍या अंकुशने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासमेटस्, डबल सीट आणि दगडी चाळ या सुपर हिट चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अंकुशच्या अभिनय कारकिर्दीला यशाच्या शिखरावर नेणारे हे तिन्ही चित्रपट ठरले. क्लासमेटस्, डबल सीट आणि दगडी चाळमधील तीनही व्यक्तिरेखा प्रेक्षकांवर छाप पाडणार्‍या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या अंकुशला या वर्षीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2015 मध्ये महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉन म्हणून निवडले.
 
अंकुशने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान प्रेक्षक व समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे निर्माण केले आहे. अंकुशसाठी 2015 वर्ष लागोपाठ 3 सुपर हिट चित्रपट, दगडी चाळने बॉक्स ऑफिसवर केलेली धूम आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खूप खास ठरले. संजय जाधव दिग्दर्शित गुरु चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या अंकुश व्यस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुरु’च्या टीझर वरून या चित्रपटात अंकुश वेगळ्या अंदाजात दिसून येणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

Show comments