Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सई-स्वप्निलची केमिस्ट्री रंगणार

Webdunia
सोमवार, 11 मे 2015 (10:51 IST)
‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना ‘प्रेम’, ‘मैत्री’ या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवलं ते या दोन सिनेमांनी. ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या एका अनोख्या जगात नेलं तर ‘दुनियादारी’ने मैत्रीची सफर घडवून आणली. या दोन्ही सिनेमाचे मेकर असलेले संजय जाधव आपल्या समोर अजून एक लव्हस्टोरी घेऊन येतायत. 
 
नुकतंच या सिनेमाचा मुहूर्त रोमँटिक गाण्याच्या रेकॉर्डिगने पार पडला. ‘तू ही रे’ असं या सिनेमाचं नाव असून स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजीवसनमध्ये सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिग झाले. एकंदरच रोमँटिक सागा असलेल्या या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक अमितराज आणि पंकज पडघन आहेत. सिनेमाची गीते गुरू ठाकुर यांनी लिहिली आहेत. गाण्याच्या रेकॉर्डिगची सुरुवात झाली ती अमितराज दिग्दर्शित गाण्याने. हे गाणं आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय. 
 
मनस्विनी लता रवींद्र यांनी सिनेमाची कथा लिहिली असून करण एन्टरटेन्मेंट तसेच इंडियन फिल्म्स स्टुडिओ आणि संजय जाधव यांच्या ड्रिमिंग 24/7 या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती होणार आहे. ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ प्रमाणेच याही सिनेमात आपल्याला तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments