Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उलगडलं '& जरा हटके' सिनेमाचं हटके पोस्टर !

Webdunia
बुधवार, 13 एप्रिल 2016 (16:20 IST)
प्रेक्षकांना सहज आपलसं करणारे आणि त्यांची अचूक नस ओळखणा ऱ्या दिग्दर्शकांपैकी एक रवी जाधव आपल्या चांगल्याच परिचयाचे आहेत. इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला आणि रवी जाधव या दोघांची निर्मिती असलेल्या & जरा हटके या आगामी सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आजच्या जमान्यात नात्यांमधली बदलत जाणारी भावनिकता आणि दोन पिढ्यांमधली घातलेली सांगड या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित आणि मिताली जोशी लिखित या सिनेमात आपल्याला मराठी आणि बंगाली संस्कृतीचा संगम अनुभवता येणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांची मुलं कसं स्वीकारतात याच चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. नुकतचं या सिनेमाचं आॅफिशल पोस्टर उलगडलं गेलं आहे. नावाप्रमाणेच हटके असं या सिनेमाचं पोस्टर असून नात्यांमधली पारदर्शकता आपल्याला या पोस्टरमधून अनुभवता येईल.  

'&'  हे मुळाक्षरचं मुळात  दोन भिन्न गोष्टींना जोडणारं असून नात्यांना पूर्णत्व देणार आहे. त्यामुळेच पोस्टरमध्येही ' & ' या मुळाक्षराला अधोरेखित करण्यात आलं आहे. मोठ्या आकारातला तसेच रंगेबेरंगी  & पोस्टरमध्ये खुलून दिसतो आहे. अनेक रंग आपल्याला या पोस्टरमध्ये दिसून येत आहेत. आपल्या जीवनातील नाती अशीच रंगबेरंगी आहेत.  बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहे. इंद्रनील सोबतच मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत.   नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

Show comments