Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक डाव धोबीपछाड २ जूनला प्रदर्शित

Webdunia
PRPR
मराठीतील अष्टपैलू कलावंत म्हणून ओळखला जाणारा अशोक सराफ आता नव्या भूमिकेत त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे. ही भूमिका आहे, निर्मात्याची. त्याच्या श्री मंगेश फिल्म्स या बॅनरचा पहिला मराठी चित्रपट 'एक डाव धोबीपछाड' येत्या दोन जूनला झी टॉकीजच्या सहकार्याने अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

' झी टॉकीज'चा पहिला चित्रपट असलेल्या 'साडे माडे तीन'मध्येही अशोक सराफ यांची मध्यवर्ती भूमिका होती. त्यानंतर आता त्यांच्याच सहकार्याने त्याचा नवीन चित्रपटही येतो आहे. हा चित्रपट विनोदी असून त्यात अशोकचीच मध्यवर्ती भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून गिरीश जोशी यांनी त्याची पटकथा लिहिली आहे. संवाद किरण यज्ञोपवित यांचे आहेत. अशोक सराफ यांच्याव्यतिरिक्त प्रसाद ओक, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर, मुक्ता बर्वे, संजय मोने, विनय येडेकर हे कलावंतही यात आहेत.

मराठी चित्रपटांचा एका काळ गाजविणारे अशोक सराफ गेल्या काही दिवसांपासून मोजकेच काम करीत आहेत. त्यातही चित्रपटांपेक्षा ते मालिकांमध्ये गेल्या काही काळात रमले होते. पण साडेमाडेतीनच्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या नव्या लाटेत तेही सहभागी झाले. आता त्यांनीच निर्मिती केलेला नवा चित्रपट येतो आहे. त्यामुळे त्याच्याविषयी रसिकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments