Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'झिंग झिंग झिंगाट' गाण्याने रंगला 'सलाम पुणे'चा महाराष्ट्र दिन सोहळा

Webdunia
शनिवार, 7 मे 2016 (10:57 IST)
यंदाचा सलाम पुणे आयोजित 'महाराष्ट्र दिन सोहळा' 'पोरी पिंगा गं...' पासून 'याडं लागलंय...' 'झिंग झिंग झिंगाट' सारख्या धमाल गाण्यांच्या मस्तीत रंगला. संगीतकार हर्षित अभिराज यांच्या मैनेची हवा या गाण्याच्या सादरीकरणाने, निखील महामुनी यांच्या वरूण राजाच्या प्रार्थनेने आणि ज्युनिअर अमिताभ बच्चनच्या डॉयलॉगबाजीने या सोहळ्याला चार चांद लावले. 
 
महेश कोठारे यांच्या 'गणपती बाप्पा मोरया', 'सरस्वती', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', या मालिकांना तसेच 'ढोलकीच्या तालावर', 'परिपूर्ण मेजवानी' या शोला यावेळी सलाम पुणे पुरस्काराने गौरविण्यात आले. 'अस सासर सुरेख बाई ' या मालिकेतील अभिनेत्री मृणाल दुसाणीस आणि संतोष जुवेकर, 'पोश्टर गर्ल' चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील, 'पोलीस लाईन'चे दिग्दर्शक राजू पार्सेकर तसेच सहायक अभिनेता प्रशांत तपस्वी यांना यावेळी सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'विठा' या नाटकातील संगीत आणि रंगभूषेबद्दल शंतनू घुले तर 33 वर्षानंतर गिराश कर्नाड यांना मराठी सिनेसृष्टीत घेवून येणाऱ्या 'सरगम' या चित्रपटाचा यावेळी पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
 
यावेळी फिरोज मुजावर यांनी बहारदार अशी कथःक  आणि लावणी ची जुगलबंदी सादर केली तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वरूनराजाची प्रार्थना यावेळी संगीतकार निखील महामुनी यांनी सादर केली संगीतकार हर्षित अभिराज यांनी ... सर्व प्रथम ...जिथं तिथं मैनेची हवा हे गाणे ईथे  सादर केले ज्यावर अभिनेत्री राधा कुलकर्णी , अभिनेता मयूर लोणकर आणि साहिल मरगजे यांनी नृत्य सादर केले. 
 
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल संभाजीराजे थोरवे आणि योगेश पिंगळे यांना यावेळी सलाम पुणे पुरस्काराने गौरविण्यात आले. सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर कलर्स वाहिनीचे प्रमुख संचालक संजय उपाध्याय, सर्व पुरस्कारप्राप्त मालिकांमधील कलाकार, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, प्राध्यापक फुलचंद चाटे, विजय चौधरी, एम के धुमाळ, दीपक सवाखंडे, अभिनेता देवेंद्र भगत, 'एक अलबेला' चित्रपटातील अभिनेत्री राधा सागर हे कलाकार यावेळी उपस्थित होते. 
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments