Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मल्टीस्टारर सिनेमा शासन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (14:34 IST)
सिनेमा हा समाजाचा प्रतिबिंब असतो  असा म्हटलं जातं, सिनेमातून समाज प्रबोधनही केल जातं. मराठी सिनेमा बदलतो आहे, अनेक चांगले विषय मराठीसृष्टीत हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन येतोय शासन हा सिनेमा. वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून मराठी सिनेसृष्टीला दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन करणारे गजेंद्र अहिरे यांच्या शासन सिनेमात आपल्यलाला दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.शासन सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. गजेंद्र अहिरे हे मराठी चित्रपट सृष्टीतले बहुचर्चित आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 
 
राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात. आणि या खेळात जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या खेळात सहभागी झालेल्या राजकारण्याची असते. राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेलेला युनिअन लीडर अशाच उद्भवलेल्या एका परिस्थितीचा फायदा कसा करून घेतो याचे चित्रिकरण या सिनेमात करण्यात आले आहे. 
 
शेखर पाठक हे या सिनेमाचे निर्माते तसेच प्रस्तुतकर्ता असून श्रेया फिल्म्स प्रा. लि . या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  मकरंद अनासपुरे,  भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे,  किरण करमरकर  अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.मराठीतले ख्यातनाम कवी आणि साहित्यिक  विं दा करंदीकर यांची माझ्या मना बन दगड या कवितेला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिला असून जसराज जोशी याने हे गाणं गायल आहे. त्याचप्रमाणे  नरेंद्र भिडे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले असून जयदीप वैद्य यांनी देखील  गाण गायलं आहे. एकंदरच दिग्गज कलाकारांनी नटलेला असा शासन हा सिनेमा २२ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments