Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'लाल इश्क़'चा पाडवा

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2016 (13:34 IST)
मराठी सिनेमांतील आशयसमृद्ध विषय आणि बांधणीमुळे अनेक दिग्गजांना मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ पडत आहे. दर्जेदार कथानकावर आधारित चित्रपटांचे प्रेक्षकांकडून स्वागत होत असल्यामुळे अनेक हिंदी निर्माते मराठी सिनेमात गुंतवणूक करू पाहत आहेत. बॉलीवूडमधील भव्य दिव्य चित्रपट करणारे दिग्दर्शक म्हणून प्रचलित असलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही मराठी सिनेसृष्टीपासून दूर राहू शकले नाहीत. मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास इच्छुक असणा-या संजय लीला भन्साळींनी आपली हि इच्छा 'लाल इश्क' चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. स्वप्ना जोशी-वाघमारे दिग्दर्शित 'लाल इश्क…गुपित आहे साक्षीला' या सिनेमात स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी हि दोन कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमातल्या कलाकारांनी पारंपारिक वेशभूषेत जुहुच्या भन्साळी प्रोडक्शन मध्ये गुढीपाडवा साजरा केला. 
शिरीष लाटकर लिखित हा सिनेमा भन्साळी प्रॉडक्शनची निर्मिती असून शबिना खान हया सिनेमाच्या सहनिर्मात्या आहेत. लाल इश्क़ हा मराठी सिनेमांमधला सर्वात उत्सुकता वाढवणारा चित्रपट आहे. येत्या २७ मे रोजी 'लाल इश्क़'च गुपित जगजाहीर होणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

चित्रपटाच्या सीक्वलनंतर कमल हासन 'इंडियन 3'च्या तयारीला!

केदारनाथ ज्योतिर्लिंग Kedarnath Jyotirlinga

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

Show comments