Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शालेय परीक्षेतही रिंकू ‘सैराट’च

Webdunia
नुकताच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वच थिएटर्सच्या बाहेर हाऊसफुल असल्याचे बोर्ड झळकत आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरु नववीची परीक्षा पास झाली आहे.
 
सैराट हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजे आकाश ठोसर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. 
 
सैराट चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी रिंकूने 9 वी ची परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेचा आता निकाल लागला आहे. 
 
9 वीच्या परीक्षेत रिंकूने 81.60 टक्के गुण मिळवले आहेत. या निकालानंतर रिंकूने आपल्या फेसबुकवर शाळेतील गणवेशाचा फोटो पोस्ट करत 81.60 टक्के गुण मिळाल्याचे सांगितले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

चित्रपटाच्या सीक्वलनंतर कमल हासन 'इंडियन 3'च्या तयारीला!

केदारनाथ ज्योतिर्लिंग Kedarnath Jyotirlinga

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments