Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'स्टार प्रवाह'चं नवं ब्रीद 'आता थांबायचं नाय!'

Webdunia
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016 (12:47 IST)
जगभरात आघाडीवर असलेल्या स्टार नेटवर्कनं 'स्टार प्रवाह'च्या रुपानंमराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण करून अल्पावधीतच स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. वैविध्यपूर्ण विषय आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या कलाकृतींतून रसिकप्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन केलं.
 
समृ्द्ध मराठी संस्कृती जोपासतानाच 'स्टार प्रवाह' एक पाऊल पुढे टाकून अवघ्या महाराष्ट्राला आवाहन करत आहे 'आता थांबायचं नाय!'
 
पारंपरिक विचारसरणीमुळे मराठी माणूस धोका पत्करत नाही. आजच्या तरुणाईमध्ये बंदिस्त झाल्याची, अडकल्याची भावना आहे. मराठी माणसाची हीच भिडस्त प्रवृत्ती प्रगतीच्या नवनव्या वाटा आजमावून पाहण्यातला मोठा अडथळा ठरते आहे.
 
या प्रवृत्तीला आणि मनोभूमिकेला आव्हान देऊन मराठी माणसांत, तरूणाईत आणि पर्यायानं महाराष्ट्रात उत्साह, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सशक्त कथानक आणि दमदार व्यक्तिरेखांच्या मालिका घेऊन येत आहे. मराठी दूरचित्रवाणीमध्ये नवा पायंडा पाडत आहे.
 
आपल्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जात असतानाच काळानुरुप होणारे बदल स्वीकारत आधुनिक विचारही मांडत आहे. जुनाट विचारांना झुगारून देत नवी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी मराठी माणूस आणि महाराष्ट्र किती धडपड करू शकतो, यशाची नवी क्षितिजं गाठू शकतो हे 'स्टार प्रवाह' दाखवून देईल. शिक्षण, करिअर, व्यापार, नातेसंबंध अशा सर्वच क्षेत्रात मराठी माणूस नक्कीच अग्रेसर राहील.
 
या पुढे यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी अधिक आत्मविश्वासानं पाऊल टाकेल...
म्हणूनच अवघ्या महाराष्ट्राला आवाहन आहे....
आता थांबायचं नाय !!

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

पुढील लेख
Show comments