Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी पण सचिन' मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर'

मी पण सचिन  मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर
Webdunia
सोमवार, 31 डिसेंबर 2018 (13:41 IST)
काही दिवसांपूर्वीच 'मी पण सचिन' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचे नवीन पोस्टर आले आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नील जोशीसोबत अभिजीत खांडकेकरही झळकत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक हावभाव बघून ही भूमिकाही विशेष असणार, याचा आपण अंदाज बांधू शकतो. आता अभिजीत या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारत आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. खरं तर क्रिकेट आणि आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे. क्रिकेटमध्ये जसे शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही, आयुष्यचेही अगदी तसेच असते. क्रिकेट आणि आयुष्यातील हे साम्य दाखवणारा, प्रेम, नात्याची परिभाषा शिकवणारा आणि आपल्या स्वप्नांचा माग घेण्यास प्रवृत्त करणारा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर सोबत प्रियदर्शन जाधवही आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' या चित्रपटाच्या निर्मात्याची धुरा नीता जाधव, संजय छाब्रिया, गणेश गीते आणि निखिल फुटाणे यांनी सांभाळली आहे. तर श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरणही केले जाणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर"

मडगाव एक्सप्रेस'च्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त दिग्दर्शक कुणाल खेमूने केली मोठी घोषणा

सलमान खानच्या सुरक्षेमुळे सिकंदरचा प्लॅन बदलला, ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द!

भेट देण्यासाठी अमेरिकेतील सुंदर ठिकाणे

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

पुढील लेख
Show comments