Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता अक्षय वाघमारेचे पहिले रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (16:38 IST)
बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झालेला अभिनेता अक्षय वाघमारेचे एक नवे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेक मालिका व सिनेमांमधून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयचे पहिलेच रोमँटिक गाणे आहे. 'हळवेसे' असे या गाण्याचे नाव असून हे गाणे जीवन मराठे व निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केले आहे. मुळशी येथे चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या गीताला स्वप्नील सावंत व जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत. योगेश अनिल तावर हे गाण्याचे दिग्दर्शक असून अमोल घोडके हे कार्यकारी निर्माते आहेत. राहुल झेंडे यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले असून वैभव लमतुरे हे प्रॉडक्शन हेड आहेत.   
 
श्रीनिवास कुलकर्णी व मधुसुधन कुलकर्णी यांचे हे तिसरे गाणे असून 'मन हे वेडे' व 'सुख दुःख सारी' हे दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आधीच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पोच पावती मिळाल्याने याही गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी विश्वास निर्माते श्रीनिवास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 'हळवेसे' या गाण्यासाठी नायक म्हणून अक्षय वाघमारे यांचेच नाव डोक्यात होते. मात्र नायिका सानिया निकम हिचे 'मन हे वेडे' गीताचे इंस्टाग्रामवर रील पाहून तिची या गाण्यासाठी निवड करण्यात आल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले. हळवेसे गाण्यात काम करण्याच्या अनुभवाविषयी अक्षय सांगतो, की 'या गाण्याची सर्व टीम उत्साही असल्याकारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमँटिक गाणे असल्याने या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे.' अक्षय व सानियावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई आयसीयूमध्ये दाखल

नवऱ्याची २१ कर्तव्ये

Sikandar Trailer: सिकंदर'चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

पुढील लेख
Show comments