Festival Posters

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विवाहबंधनात अडकली

Webdunia
मंगळवार, 18 मे 2021 (21:36 IST)
मराठी सिनेमातील ‘अप्सरा’ निगडीची रहिवासी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज विवाहबंधनात अडकली. दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर यांच्याशी ती विवाहबद्ध झाली आहे. विशेष म्हणजे सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस असून लग्नाची बातमी देत तिनं तिच्या फॅन्सला सुखद धक्का दिला आहे. दोन फेब्रुवारी रोजी तिचा साखरपुडा झाला होता.
सोनालीने फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. तिने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना सोनालीने लिहिलं आहे की, ‘आम्ही जूनमध्ये ‘युके’ला लग्न करणार होतो.
युकेच्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे करावी लागली. मग स्थळाच्या उपलब्धतेनुसार अनुसार जुलैमधली तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शुटिंग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनातही !’
 
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नटरंग चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी, ‘अप्सरा आली…’ या लावणीमुळे चाहत्यांमध्ये सोनालीची ओळख अप्सरा म्हणून निर्माण झाली. सोनालीच्या नावावर अनेक सुपरहिट मराठी चित्रपट आहेत. एक-दोन हिंदी चित्रपटात देखील तिनं भुमिका केल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'धुरंधर २' चे वादळ पाकिस्तानात घोंघावले: Netflix लाही केले क्रॅश, बनला क्रमांक १ चित्रपट

Fun Time 'पेपर-लीक' डॉक्टरने पेशेंटला दिली दोन इंजेक्शन

जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू

पुढील लेख
Show comments