Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय केळकरने या शोमध्ये बाजी मारत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला

Webdunia
सोमवार, 9 जानेवारी 2023 (07:30 IST)
चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4)ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालं. एकापेक्षा एक तगडे १६ स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले. शंभर दिवसांच्या या प्रवासात अखेरपर्यंत राहिले ते टॉप ५ स्पर्धक. यात राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकरचा समावेश होता.  रंगलेल्या या रिएलिटी शोच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने घराबाहेर पडले. त्यानंतर अक्षय आणि अपूर्वामध्ये कोण बाजी मारणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते आणि अखेर अक्षय केळकरने या शोमध्ये बाजी मारत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला आहे तर अपूर्वा नेमळेकर(Apurva Nemlekar)ने पटकावले दुसरे स्थान. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर. 
 
१०० दिवसांचा टप्पा पार करून अक्षय केळकर महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहचला. अक्षयने यासाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप हुशारीने तो खेळला. त्याने कधी कुणाची मनं दुखावली नाहीत. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. अगदी ज्या सदस्यांचे आणि त्याचे पटले नाही त्यांच्याशीही त्याने जुळवून घेतले. मात्र जे पटले नाही त्याला विरोधही केला. त्यामुळे अक्षयचा स्वभाव आणि खेळ पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे अक्षय बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता ठरला आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत. सोशल मीडियावर ते आनंद व्यक्त करत अक्षयवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच अक्षयने देखील प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments