Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१५,१६,१७ नोव्हेंबर २०१७ रोजी ''मुंबईमध्ये ३ दिवसीय नाट्य महोत्सव''

anhad naad nataya mahotsav
Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (12:39 IST)
काळाला चिंतनाने गढले आणि रचले जाते. ‘चिंतन’ हे आपल्या अंतरंगातून सृजित होते आणि वैश्विक क्षितिजांना पार करून विश्वात जीवित राहते. कलात्मक चिंतनात मानवातील विष पिण्याची क्षमता आहे. १९९० नंतरचा काळ हा संपूर्ण जगासाठी “अर्थहीन” होण्याचा काळ आहे , हा एकाधिकार आणि वर्चस्ववादाचा काळ आहे. विज्ञानाच्या सिद्धांतांचा तंत्रज्ञाना पुरता सीमित होण्याचा आणि खरेदी-विक्रीचा काळ आहे. मीडियाचा जनतेऐवजी सत्तेची चाकरी करण्याचा काळ आहे. अशावेळेस जनतेला त्यांच्या मुद्यांसाठी "चिंतन” आणि एका विचार मंचाची आवश्यकता आहे.
१२ ऑगस्ट १९९२ पासून “थियेटर ऑफ रेलेवंस”रंग सिद्धांत जनतेसाठी 'जन चिंतन मंच' म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स”
नाट्य दर्शनाने, रस्ते, चौक, गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे. 
‘थिएटर ऑफ रेलेवंस’ चे सिद्धांत
१) ‘थिएटर ऑफ रेलेवंस’हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
२) कला ही कलेसाठी नसून समाजाप्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून उपलब्ध असेल.
४) जे स्वतःचा बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.
५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.
 
(रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि
क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.)
 
आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात, मानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी”या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी, मुंबईत १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय 'नाट्य उत्सव' साजरा करण्याचे आयोजन केले आहे. आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे. कारण “थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांतानुसार,’प्रेक्षक’हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) मुंबई येथे अनुक्रमे १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर अनुपम खेर गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

सर्व पहा

नवीन

अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स कसे वाढवायचे असे विचारले, चाहते म्हणाले रेखासोबतचा सेल्फी टाका

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Viswas Swaroopam नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम

सोनू कक्करने भाऊ टोनी कक्कर आणि नेहा कक्करशी असलेले नाते तोडले

श्रेया घोषालचे नवीन भक्तीगीत रिलीज,गायिका अभिनय करताना दिसली

पुढील लेख
Show comments