suvichar

Bharat Maza Desh Ahe : प्रत्येक मुलाने पाहावा असा 'भारत माझा देश आहे'

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (16:02 IST)
'अहिंसा परमो धर्म:' अशी टॅगलाईन असलेला पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. नावावरूनच हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे, हे कळतेय. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
पोस्टरमध्ये राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे बालकलाकार दिसत असून त्यांच्यामध्ये एक बकरीही दिसत आहे. आता 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचा बकरीशी काय संबंध आणि तिची या चित्रपटात काय भूमिका आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. यात या बालकरांसोबत मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम आणि हेमांगी कवीही दिसत आहेत. पोस्टरमध्ये टीव्हीवर ब्रेकिंग न्यूजही दिसत आहे. ही ब्रेकिंग न्यूज नेमकी कोणती? याचे उत्तर चित्रपटातच मिळेल. 
 
चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, "हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे, मात्र या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. आतापर्यंत क्वचितच असा विषय या पद्धतीच्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला असेल. या चित्रपटात अनेक प्रसंग हसवत हसवत, नकळत खूप गोष्टी सांगून जातात, मनाला स्पर्शून जातात. हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक लहान मुलाने आवर्जून पाहावा, असा हा 'भारत माझा देश आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय अतिशय दमदार असून प्रत्येकाने आपली व्यक्तरेखा उत्तम साकारली आहे. हा चित्रपट एक सकारात्मक दिशा देणारा आहे.''
 
    'भारत माझा देश आहे' या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांची असून निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद लाभले आहेत. .या चित्रपटाला  समीर सामंत गीत लाभले असून अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत आहे. निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलक आहेत तर चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद

धुरंधर २' ने ४०० कोटींचा टप्पा ओलांडला, 'पुष्पा २' आणि 'जवान' चे विक्रम मोडले

पुढील लेख
Show comments