rashifal-2026

आता येणार 'बॉईज ३'

Webdunia
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 (09:27 IST)
ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, 'बॉईज २' चे इंजिन बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही सुसाट वेगाने धावत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या सुपर डुपर हिटचे नुकतेच मुंबई येथे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन करण्यात आले. 'बॉईज २' चे निर्माते राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सक्सेस पार्टीत, 'बॉईज ३' सिनेमाची घोषणादेखील करण्यात आली. तसेच या सिनेमाने अवघ्या १७ दिवसांमध्ये १६ करोडहून अधिक कमाई केली असल्याची माहिती इरॉस इंटरनेशनलचे नंदू अहुजा यांनी दिली. 
 
वरळी येथील आलिशान जेड गार्डनमध्ये पार पडलेल्या या पार्टीचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला.  यादरम्यान, 'बॉईज २' चा दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी 'बॉईज २' ला दिलेल्या भरघोस प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच यापुढे 'बॉईज ३' साठी ऋषिकेश कोळीसोबत पुन्हा तयारीला लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 
 
लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रात हाउसफुल असलेल्या या सिनेमाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक वितरणदेखील केले जात आहे. त्यामुळे, 'बॉईज' आणि 'बॉईज २' अश्या सलग दोन सिनेमे सुपरहिट देणारा विशाल आगामी 'बॉईज ३' मध्ये हॅटट्रीक करणार का, हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असेल. हे नक्की ! 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आली देवी, व्हिडिओ व्हायरल

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

पुढील लेख
Show comments