Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BOYZ 4 : 'बॉईज 4’ मधील 'ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (18:17 IST)
‘बॅाईज’ चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॅाईज ४’मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. आता ‘बॅाईज ४’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या हॅपनिंग साँगला अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत आणि बोल लाभले आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजाने हे गाणे अधिकच जल्लोशमय झाले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत खूपच स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रत्येक पार्टीत हे गाणे नक्कीच वाजणार.
 
 गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, " 'बॉईज ४' मधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, असाच प्रतिसाद 'ये ना राणी तू ये ना ' आताच्या धकाधकीच्या जीवनात मूड फ्रेश करणारे हे गाणे आहे. तरूणाईला हे गाणे विशेष आवडणारे आहे. गाणे जरी भन्नाट असले तरी याचे नृत्यदिग्दर्शनही तितकेच भारी आहे. मुळात हे गाणे करताना आम्हीही खूप धमाल केली आहे. मुलांनीही हे गाणे खूप एन्जॅाय केले आहे. मला खात्री आहे, संगीतप्रेमींना हे गाणे तितकेच आवडेल.’’ सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २० ऑक्टोबरला ‘बॅाईज ४’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments