Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री मनवा नाईक सोबत कॅब चालकाचे गैरवर्तन

Webdunia
रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (13:39 IST)
चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईकने एका कॅब चालकावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीचा आरोप आहे की, जेव्हा ती टॅक्सीने घरी जात होती, तेव्हा कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि धमकी दिली. मनवा नाईकने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मनवासोबतची ही घटना शनिवारी संध्याकाळी मुंबईत घडली. ही गोष्ट त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली आहे. 
 
अभिनेत्री मनवा नाईक ने  शनिवारी तिच्या सोबत झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती फेसबुकवरून शेअर केली आहे. मनवाला एका उबेर चालकाने धमकावले. तिने आपल्या बरोबर घडलेला प्रकार सांगितला असून या पोस्ट ,मध्ये तिने वाहनचालकांचा फोटो आणि गाडीचा नंबर देखील शेअर केला आहे. 
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे सांगितले आहे की तिने घरी जाण्यासाठी रात्री 8.15 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथून कॅब घेतली. जेव्हा ती कॅबमध्ये बसली तेव्हा ड्रायव्हर फोनवर बोलू लागला, ज्यावर अभिनेत्रीने आक्षेप घेतला कारण तो फोनवर बोलत असताना गाडी चालवत होता. याशिवाय वाहनचालकानेही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यादरम्यान एका वाहतूक पोलिसाने कॅब थांबवली आणि त्याचा फोटोही काढला. यानंतर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीने ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला कॅब सोडण्याची विनंती केली.
 
मनवा नाईक म्हणते की, कॅब ड्रायव्हर अचानक तिच्यावर चिडला आणि म्हणाला, 'ती 500 रुपये दंड भरणार का?' अभिनेत्रीचा दावा आहे की ड्रायव्हरने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. जेव्हा अभिनेत्रीने कॅब पोलिस स्टेशनमध्ये नेण्यास सांगितले तेव्हा ड्रायव्हरने कॅब अंधाऱ्या भागात उभी केली. यानंतर चालक भरधाव वेगाने कॅब घेऊन निघून गेला. यानंतर मनवा नाईक यांनी उबर सेफ्टी हेल्पलाइनवर कॉल केला. ती एक्झिक्युटिव्हशी बोलत होती, त्यादरम्यान ड्रायव्हरने कॅबचा वेग आणखी वाढवला. अभिनेत्रीने लाख मागूनही चालकाने कॅब थांबवली नाही. तसेच दुसर्‍याला फोन करू लागला.
 
अभिनेत्रीने मदतीची याचना सुरू केली. यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी आणि ऑटोचालकाने कॅब ड्रायव्हरला घेरले आणि अभिनेत्रीची सुटका केली. अभिनेत्री म्हणते की मी ठीक आहे, पण मला भीती वाटते.   
 
अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना, मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी कॅब चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिले की, 'शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरच दोषीवर कारवाई केली जाईल.'दोषीला लवकरात लवकर अटक केली जाईल.
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार 'खास',आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

रणवीर सिंगच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी अपडेट, आरोपींना नोटीस

'छावा' च्या सेटवरुन लीक झाला विकी कौशलचा लुक, छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात दिसले

सलमान खान प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलिसांनी तापी नदीतून दोन पिस्तूल आणि गोळ्या जप्त केल्या

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

पुढील लेख
Show comments