Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया आरती प्रदर्शित

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2024 (14:13 IST)
आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या आनंद पिंपळकर यांचा पुढाकार
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणाचा, बलिदानाचा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातली शिवप्रेमी,धर्मप्रेमी, शंभूप्रेमी जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळा मध्ये दिडशे लढाया यशस्वीरित्या जिंकल्या. थोरल्या महाराजांच्या महानिर्वाणानंतर दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांचे स्वरूप म्हणजे ईश्वर स्वरूपच आहे. ‘यदा यदाही धर्मस्य’ पद्धतीने धर्मरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पार पाडली नसती तर औरंगजेबाने महाराष्ट्रात नंगानाच केला असता. छत्रपती संभाजी महाराजांचे पुण्यस्मरण म्हणून आनंदी वास्तु प्रोडक्शन निर्मित छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणारी व आर्ततेने केली गेलेली आरती नुकतीच प्रदर्शित झाली असून आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही आरती पहायला मिळेल. ‘जय शंभूराया’ या आरतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन केले आहे.
 
आरती ही देवतांची होते आणि छत्रपती संभाजी महाराज हे सर्व धर्मप्रेमींचे देवच आहेत.. त्यांच्या अखंड बुद्धिमत्तेने, शौर्याने, बलिदानाने त्यांचे देवत्व सिद्ध होते. देवतेची प्रत्येकाची संकल्पना ही वेगळी आहे पण छत्रपती संभाजी महाराज हे नावाप्रमाणेच शंभू महादेवच वाटतात आणि त्यांचे आर्ततेने स्मरण सुमनांजली म्हणजे हे आरती गीत आहे असे मत प्रसिद्ध वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले. अत्यंत कमी वेळामध्ये हे शिवधनुष्य पेलण्याचे कार्य केवळ श्री शंभूराजांच्या आशीर्वादाने झाले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
‘जय शंभूराया’ या आरती गीताच्या चित्रीकरणाची सर्व जबाबदारी अगदी कमी कालावधीत दिग्दर्शक सुरज वामन यांनी पार पाडली असून अजय घाडगे यांनी सुंदर छायाचित्रण केलं, अक्षय पितळे व निनाद शिंदे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.  हे गीत सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण यांनी लिहिले आहे. संगीत तेजस साळुंखे यांचे आहे तर संदीप रोकडे आणि दीक्षा वावळ यांच्या तडफदार आवाजामध्ये हे आरती गीत ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हे आरती गीत शब्दबद्ध केलंय शुभम कुलकर्णी यांनी तर आनंद पिंपळकर,प्रणव पिंपळकर, धनश्री कदम, रोहित इंजनवारे यांच्या प्रमुख भूमिका असून निर्माती आहे अश्विनी पिंपळकर.
 
प्रत्येक शंभूभक्ताने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण म्हणून दररोज हे आरती गीत ऐकायलाच हवे, असे आवाहन श्री आनंद पिंपळकर यांनी केले आहे. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या youtube चॅनलवर ‘जय शंभूराया’  हे आरती गीत आपल्याला पहाता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments