Dharma Sangrah

Dagadi Chawl 2- 'दगडी चाळ 2' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं?

Webdunia
मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:53 IST)
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित,चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 
 
'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. 
 
मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. 
 
या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

दिलीप कुमार आणि त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानू यांची प्रेमकहाणी खूप खास होती

New Year 2026: गोव्यात फक्त समुद्रकिनारेच नाही तर ही ठिकाणे देखील सुंदर आहे

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

प्रेम चोप्रा या धोकादायक आजाराशी झुंजत आहे, जावयाने खुलासा केला

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

पुढील लेख
Show comments