rashifal-2026

DHONDI CHAMPYA : 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’मध्ये बहरणार ओवी- आदित्यची प्रेमकहाणी धमाल टिझर प्रदर्शित

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (23:32 IST)
'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’. हे नाव ऐकूनच खदखदून हसायला येणाऱ्या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून हा एक धमाल विनोदी चित्रपट दिसतोय. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ची निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.
 
ही प्रेमकथा धोंडी आणि चंप्याची आहे, हे आपल्याला यापूर्वीच कळले आहे. आता या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी बहरत आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी. टिझरमध्ये या दोघांमध्येही अनेक खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता धोंडी -चंप्या आणि ओवी- आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.
 
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, " हा एक विनोदी चित्रपट असून यात भरत जाधव, वैभव मांगले यांच्यासारखे जबरदस्त कलाकार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना लोटपोट हसवेल. एकाच गावातील दोन व्यक्तींमध्ये वैमनस्य असताना त्यांच्या मुलांमध्ये आणि जनावरांमध्ये जेव्हा प्रेमाचे सुत जुळू लागते, तेव्हा होणारी धमाल यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.''
 
'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांचा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित होणार, या दिवशी येणार हा चित्रपट

धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले

रोनित रॉयने त्याच्या कुटुंबासाठी उचलले मोठे पाऊल, महत्त्वाची माहिती शेअर केली

Dharmendra Facts धर्मेंद्र यांच्याबद्दल ५० तथ्ये जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

सनातनच्या रक्षणासाठी नंदमुरी बालकृष्ण पोहोचले; अखंड २ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

नंदिका द्विवेदी कोण आहे? स्मृती -पलाश वादातील मिस्ट्री गर्लने तिचे मौन तोडले आणि अफवांपासून स्वतःला दूर ठेवले

सुरज चव्हाणच्या लग्न समारंभाला सुरुवात

रणदीप हुड्डाने केली लवकरच पालक होणार असल्याची घोषणा

धरमजी एक जिवंत आणि बहुमुखी व्यक्तिमत्व होते, शेखर सुमनने अशी केली आठवण

Dolphin Destinations In India भारतातील या ठिकाणी डॉल्फिन जवळून पाहता येतात

पुढील लेख
Show comments