Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बघा अभिनेता मकरंद देशपांडेची एक वेगळीच भूमिका

बघा अभिनेता मकरंद देशपांडेची एक वेगळीच भूमिका
, बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (21:42 IST)
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये  स्वतः हेमंत ढोमेची झलकही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे ‘दगडी चाळ २’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेते मकरंद देशपांडे यांची एक वेगळीच भूमिका या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
 
ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतो. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या ३ मार्चला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुहीपासून घटस्फोटानंतर 5 वर्षांनी 'तारक मेहता' सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा लग्न करणार, जाणून घ्या कोण आहे वधू?