प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे पुण्यात सकाळी हृदयविकाराच्या त्रासाने मृत्यू झाला.ते गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या त्रासाने ग्रस्त होते. गेल्या 15 दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यांनी आज सकाळी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपट क्षेत्रात देखील काम केले. त्यांनी महेश भट आणि तनुजा चंद्रा सोबत सहाय्यक दिगदर्शक म्हणून काम केले होते. प्रवीण यांनी मान सन्मान, भैरू पैलवान की जय, बोकड, दुनिया गेली तेल लावत, हा मी मराठा, ह्र्दयात समथिंग समथिंग, तुझीच रे हे नामांकित चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जातील .त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.