Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

FAUJ : मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार 'फौज' द मराठा बटालियन

fauj
, शुक्रवार, 21 जुलै 2023 (15:16 IST)
Fauj the Maratha Battalion 'फौज' हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण इथे सुरक्षित असतो. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज - द मराठा बटालियन’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. स्वामी चरण फिल्म्स प्रस्तुत, निर्मित हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल. 
 
पोस्टरमध्ये फौजी सीमेवर देशाचे रक्षण करताना दिसत असून देशाच्या अभिमानासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे सैनिक  म्हणजे देशाची सर्वात मोठी संपत्ती. या शूरवीर फौजींची विजयगाथा 'फौज - द मराठा बटालियन’मधून पाहायला मिळणार आहे.
 
दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात,  ‘’ मराठा बटालियन ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. इंग्रजांच्या काळातही ती होती. मराठा बटालियनला सर्वात चपळ आणि शूर मानले जाते. या मराठा बटालियनने इंग्रजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक शौर्य गाजवले आहे. त्याच एका  शौर्यकथेमधील एक गोष्ट ‘फौज  द मराठा बटालियन’ या सिनेमाच्याद्वारे आम्ही मांडतोय."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Arjun Rampal: अभिनेता अर्जुन रामपाल चौथ्यांदा बाबा झाला