Dharma Sangrah

थिएटर्समध्ये गाजला, OTT वर वाजला.. प्रसाद ओकने शेअर केली इन्स्टाग्राम पोस्ट

Webdunia
मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (09:00 IST)
प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. नुकतचं झी मराठीवर धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. धर्मवीर हा सिनेमा13 मे 2022 ला महाराष्ट्रात रिलिज झाला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला आणि गाजला. महाराष्ट्रात सर्वत्र या सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. नुकताच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @oakprasad

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या टेलिव्हिजन प्रिमियरनंतर इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं, “थिएटर्स मध्ये गाजला, OTT वर वाजला आणि काल झी मराठीवर तुमच्या प्रेमामुळे सजला… #धर्मवीर… पुन्हा एकदा इतके मेसेजेस आणि कॉल्स आलेत कालपासून, अभिनंदनाचे आणि कौतुकाचे की, असं वाटलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनाच एकदा SALUTE करावा….!!!! असंच प्रेम कायम राहू द्या…!!!”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

पुढील लेख
Show comments