Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉरर कॉमेडीपट 'सुस्साट'चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु...

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2023 (08:10 IST)
अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट,ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येत आहेत 'सुस्साट' हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट. लंडनमध्ये नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्रितपणे  विनोदाची आतिषबाजी करताना दिसणार आहेत. 
 
'सुस्साट' हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर विनोद हडप यानं लिहिला आहे तर विशाल देवरुखकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिद्धार्थ जाधव,प्रथमेश परब यांच्यासोबत अभिनेत्री विदुला चौगुले पहिल्यांदाच हटके भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. विजय केंकरे आणि शुभांगी लाटकर यांच्यासारखे वरिष्ठ कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एका जुनाट प्रथेचा पर्दाफाश धमाल पद्धतीनं केला जाणार आहे. 
 
'सुस्साट' या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत,प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत. तसंच,चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांच्याकडे आहे. कुणाल करण या चित्रपटाचे संगीतकार आहेत.
 
आजपासून 'सुस्साट' चित्रपटाचं चित्रीकरण लंडन मध्ये सुरू झालं आहे. 'सुस्साट' चित्रपटाच्या कथेतील अनेक विचित्र योगायोग आणि त्यामुळे उडणारी धम्माल आता पडद्यावर पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

Indian 2: सेन्सॉर बोर्डाने 'इंडियन 2' ला U/A प्रमाणपत्रासह ग्रीन सिग्नल दिला

हिमाचलची ही ठिकाणे पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत, चला जाणून घ्या

जस्टिन बीबर अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या कॉन्सर्टमध्ये करणार परफॉर्म, घेणार एवढी फीस

प्रिया मराठे प्रेमासाठी षडयंत्र रचणार

सानंदच्या रंगमंचावर 'स्थळ आले धावून' नाटकाचे मंचन

पुढील लेख
Show comments