Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाऊसफुल 'बॉईज' ने कमावला 5.11 कोटींचा विकेंड गल्ला

Webdunia
असं म्हणतात, की चित्रपटाचा विषय जितका दमदार असतो, अगदी तितकाच दमदार प्रतिसाद सिनेमा सुपरहिट करण्यामागे प्रेक्षकांचा असतो. कारण, सिनेमातील गाण्यांना आणि संवादांना डोक्यावर उचलून धरणारा प्रेक्षकंंच सिनेमाचं भवितव्य ठरवत असतो. विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज २' ला देखील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर ५. ११ कोटींचा कमावला आहे. ज्यात फ्रायडे ओपनिंग १.३० कोटी ,शनिवारी १.६१ कोटी आणि रविवारी २.२० कोटींचा समावेश आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानादेखील पहावयास मिळत आहे. 
 
या संदर्भात करण्यात आलेल्या थिएटर व्हिजीटदरम्यान प्रथमेश सरतापे नावाचा एक अनोखा चाहता सिनेमाच्या टीमला दिसला. सामान्य प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या सिनेमागृहात प्रथमेश अंध असूनदेखील 'बॉईज २' चा मनमुराद आनंद लुटत असताना त्यांना दिसून आला. त्यामुळे, सिनेमा संपल्यानंतर त्याला भेटण्याचा मोह 'बॉईज २' च्या टीमला आवरता आला नाही. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड या प्रमुख कलाकारांसोबत दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी प्रथमेशची भेट घेतली. 'बॉईज २' ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी त्याचे आभारदेखील मानले. प्रथमेश हा एक उत्तम सिनेश्रोता असून, त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. गतवर्षीचा 'बॉईज' सिनेमा त्याला भरपूर आवडला होता, आणि त्यामुळेच  त्याला 'बॉईज २' पाहण्याची इच्छा होती. 
 
याबद्दल बोलताना, 'चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवसंच झाले आहेत. यापुढे आमची फिल्म चालेल कि नाही आम्हाला माहित नाही, पण प्रथमेशला आमचा चित्रपट आवडला हेच आमच्या चित्रपटाचं यश आहे. चित्रपटाने कितीही कोटींचा धंदा केला, तरी प्रथमेशला झालेला आनंद हाच आमच्यासाठी सिनेमा सुपरहिट झाल्याचं प्रतीक आहे', अशी प्रतिक्रिया विशाल देवरुखकर देतात. 
 
सुपरहिट 'बॉईज' नंतर आता 'बॉईज २' चा देखील डंका सर्वत्र वाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाचे ३७५ शोज सुरु असून, यावर्षीच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'बॉईज २' चा समावेशदेखील झाला आहे. कॉलेज तरुणाईचे भावविश्व मांडणाऱ्या 'बॉईज २' सिनेमाला ह्रिशिकेश कोळीचे संवाद लाभले आहेत. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रात हाऊसफुल होत असलेल्या या सिनेमाचे इरॉस इंटरनॅशलद्वारे जागतिक वितरणदेखील केलं जात आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments