Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि इतर स्पर्धक कोण?

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:58 IST)
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे
 
अभिनेते आणि दिग्दर्सक महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.
 
बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये यंदा मनोरंजन क्षेत्रातील किती कलाकार सहभागी होणार आहेत, ते लवकरच स्पष्ट होईल. हे सगळे कलाकार 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील.
 
कोण आहेत स्पर्धक?
1. तृप्ती देसाई - तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत.
2.सोनाली पाटील - कोल्हापूरच्या सोनाली पाटीलला टिकटॉकनं ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिनं वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. देवमाणूस या मालिकेत तिने अँडव्होकेट आर्याची भूमिका साकारली होती.
 
3.विशाल निकम- अभिनेता विशाल निकमची बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री झालीये. साता जन्माच्या गाठी या मालिकेतून विशालला प्रसिद्धी मिळाली होती.
4. स्नेहा वाघ- हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध चेहरा असलेली स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातली स्पर्धक आहे. स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं. तिने ज्योती, वीरा, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्य या हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
5. मीरा जगन्नाथ- मीरानं मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं माझ्या नवऱ्याचीची बायको या मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील मोमोच्या भूमिकेनं तिला लोकप्रियता मिळवून दिली.
6. आविष्कार दारव्हेकर- मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आविष्कार दारव्हेकरनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. आविष्कारनं आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये काम केलं आहे
7. डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे- गायक उत्कर्ष शिंदे हे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपैकी एक असतील.
 
8. सुरेखा कुडची - अभिनेत्री आणि नृत्यांगना सुरेखा कुडची यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी,हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत बहुचर्चित 'मीना आत्या' ही त्यांची भूमिका गाजली होती.
9. गायत्री दातार- अभिनेत्री गायत्री दातार बिग बॉसच्या घरातली एक स्पर्धक असेल.तुला पाहते रे मालिकेतील गायत्रीची भूमिका गाजली होती.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार झाशीचा किल्ला

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

पुढील लेख
Show comments