Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिकी फेम साईशा भोईरने सोडली ‘रंग माझा वेगळा’ मालिका

Saisha Bhoir
Webdunia
मंगळवार, 21 जून 2022 (08:05 IST)
छोट्या पडद्यावरील म्हणजेच टीव्हीवरील मराठी मालिका ‘रंग माझा वेगळा’ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत दीपा आणि कार्तिक या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत दीपिका आणि कार्तिकी या दोघींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु आता कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने ही मालिका सोडली आहे.
 
 साईशाच्या आई वडिलांनी तिच्यासोबत इंस्टाग्रामवर एक लाइव्ह केले होते. त्यावेळी त्यांनी कार्तिकीने मालिका का सोडली याबाबतचे कारण सांगितले होते. तसेच “पण आम्ही कल्याणला राहतो. रंग माझा वेगळाचे शूटींग हे मालाडमध्ये होते. तिकडे दररोज जाण्या-येण्यात दोन तास लागतात. त्यामुळे तिला शाळेत आणि अभ्यासासाठी फार वेळ मिळत नव्हता. तसेच यामुळे तिच्या तब्येतीवरही परिणाम जाणवू लागला आहे”, असेही त्यांनी सांगितले.
 
साईशाला एका नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली असल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साईशा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे सांगण्यात आहे. साईशा म्हणाली की, “मला खूप कंटाळा आला होता. मला शाळेत जायचे आहे. तुम्ही साईशाला म्हणजे मला कार्तिकीच्या भूमिकेत प्रेम दिले तसेच नव्या येणाऱ्या कार्तिकीलाही द्या, असे तिच्या आई वडिलांनी सांगितले. साईशा ही लवकरच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

सर्व पहा

नवीन

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments