Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग

Webdunia
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (11:52 IST)
'मी पण सचिन' या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीतून चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिकांचे आभार मानले आहेत. किंग जे. डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठी मधील पहिले रॅपर असे बिरुद मिळवलेल्या श्रेयश जाधव यांनी त्यांच्या शैलीत 'मी पण सचिन' चित्रपटाचे रॅप सॉंग बनवले आहे. हे जरी रॅप सॉंग असले तरी ते एक प्रेरणादायी गाणे सुद्धा आहे. स्वप्नांच्या दिशेने प्रवास करताना, त्या प्रवासाला पाठिंबा देताना आवश्यक अशा स्फूर्तीदायी शब्दांनी परिपूर्ण असे हे रॅप सॉंग आहे. लोकांनी कितीही मागे खेचले तरी आपल्या स्वप्नांच्या दिशेने केला जाणारा खडतर प्रवास हा नक्कीच यश मिळवून देतो. असा मतीतार्थ या रॅप सॉंग मधून मिळत आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी जे लोक मेहनत करत आहेत, अशा लोकांना हे गाणं नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.  
 
८ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या 639;मी पण सचिन 339; चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. त्याबद्दल एक कृतज्ञता आणि आपल्या फॅन्स साठी पण भेट म्हणून श्रेयश जाधव उर्फ किंग जे.डी. यांनी हे रॅप सॉंग तयार केले आहे. 'मी पण सचिन' या चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, मृणाल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावर वितरण देखील केले गेले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

पुढील लेख
Show comments