Festival Posters

कुमार सानू यांचे "हलके हलके" बोल...

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (12:42 IST)
मराठी सिनेविश्वात सध्या अनेक बदल होत आहेत. मराठी सिनेमा आपल्या कक्षा रूंदावत प्रगती करतो आहे. मराठी सिनेमांच्या चांगल्या कथा नवीन निर्मात्यांना आकर्षित करीत आहेत. ब्रम्हांडनायक मुव्हीज या निर्मितीसंस्थेने 'ढोल ताशे' हा आशयघन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. असाच अजून एक आशयघन सिनेमा ब्रम्हांडनायक मुव्हीज आणि ए .आर फिल्म्स एकत्रित निर्मिती असलेला 'हलके हलके' हा सिनेमा लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे.
 
नुकतचं कुमार सानू यांच्या सुरेल आवाजात या सिनेमातील एक रोमँटिक गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. "हलके हलके बोलणे" असे या गाण्याचे बोल असून हे गाणं सगळ्यांच्या मनात राज्य करेल यात शंका नाही. सिनेमाच्या निर्मात्या ए. अनूराधा यांचे हे गायिका म्हणून पहिले गाणे असले तरी त्यांनी कुमार सानू यांना मोलाची साथ दिली आहे. 'ढोल ताशे' या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण करणारे राज अंजूटे 'हलके हलके' या सिनेमातून दिग्दर्शनात पर्दापण करीत आहेत. सिनेमातील कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यातचं ठेवण्यात आली आहेत. ए.आर.फिल्मसच्या ए अनूराधा आणि ब्रम्हांडनायक मुव्हीजच्या स्मिता अंजूटे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल, यात शंका नाही.
 
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

सुबोध भावेंची नवी आध्यात्मिक भरारी: बाबा नीब करोरी महाराजांच्या भूमिकेतून देणार शांतीचा मंत्र

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

एप्रिल महिना संपत आला; तुम्ही मे महिन्यात सुट्टीत मुलांसोबत सहलीचे नियोजन नक्कीच करू शकतात

शाहरुख खान पत्नी गौरीसोबत जेव्हा भाड्याच्या घरात राहत होता, तेव्हा तो चंकी पांडेच्या घरी हे काम करायचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

पुढील लेख
Show comments