Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूर्वीशिवाय 'लागेना' नीलचे मन

Webdunia
बुधवार, 22 जानेवारी 2020 (10:56 IST)
प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या 'मेकअप' सिनेमाच्या ट्रेलरला आणि 'गाठी गं' या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'पूर्वी' आणि 'नील'च्या दणक्यात संपन्न झालेल्या साखरपुड्यानंतर या सिनेमातील 'लागेना' हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात 'नील'ला 'पूर्वी' बद्दल 'त्या' खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा भास, ती सोबत नसतानाही त्याला जाणवणारा तिचा सहवास, प्रेमात पडत असल्याची होणारी जाणीव हे सगळं 'नील' सोबत होताना दिसत आहे. प्रेमात पडल्यावर केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी नील करतोय. पूर्वीचा पाठलाग, तिला लपून बघणे, चांगले दिसण्यासाठी होणारी धडपड करून पूर्वीचे लक्ष वेधण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न गाण्यातून दिसतो.
 ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला साहिल कुलकर्णीने स्वरबद्ध केले असून  प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या भावना वैभव देशमुख यांनी अगदी साजेशा शब्दात मांडल्या आहे. गणेश पंडित लिखित दिग्दर्शित 'मेकअप' हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

पुढील लेख