Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नृत्य व अभिनयाची सांगड घालणारा कलाकार

Webdunia
बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (17:13 IST)
नृत्य ही कला सर्वांनाच अवगत नसते. ही कला जरी अवगत असली तरी त्याप्रमाणे ती जपून पुढे त्यात करिअर करणेही तेवढे सोपे नसते. अशाच एका मुंबईकर युवकाने नृत्यक्षेत्रात अप्रतिम काम करून दाखवले आहे. लॉफी पॉल असे त्याचे नाव. लॉफी हा केवळ भारतातच नाही तर इतर देशांतही त्याच्या नृत्यामुळे प्रसिद्ध आहे. नृत्याप्रमाणेच तो अभिनयातही उत्तम आहे. आणि याचंच फळ म्हणून त्याला आता तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. लॉफी हा वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्य करत आहे. भरतनाट्यम, हिप-हॉप, रोबोटिक्स, फोक, वेस्टर्न स्टाईल अशा अनेक प्रकारच्या नृत्यप्रकारात तो अव्वल आहे. त्याने काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे. एवढेच नाही तर चेन्नईत झालेल्या भरतम 5000 या कार्यक्रमात त्याने सेलिब्रिटी परफॉर्मन्स दिला होता. या कार्यक्रमाची पुढे गिनीज बुकात नोंदही झाली आहे. मुंबईत राहणाऱ्या एका सामान्य तरूणाने केलेल्या या कामाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
केवळ नृत्यक्षेत्रात कामगिरी न बजावता आता त्याला तामिळ सिनेसृष्टीत ब्रेक मिळाल्याने या सिनेसृष्टीला आणखी उत्तम अभिनेता मिळणार आहे. अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड चिल्ड्रन फेस्टिव्हल 2015 या कार्यक्रमासाठी लॉफी व त्याच्या ग्रुपची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारताचे त्यांनी प्रतिनिधीतव केले होते. तर या स्पर्धेत एकूण 78 विविध देशांतील डान्सर्स सहभआगी झाले होते. थायलंड, मलेशिया, मॉरिशस, रशिया अशा अनेक ठिकाणी त्याने त्याचे नृत्यकौशल्य दाखवले आहे. नृत्यक्षेत्रातील प्रसिद्ध महागुरूंकडून अनेकदा त्याची स्तुती केली गेली. तसेच त्याला नृत्यक्षेत्रातील अप्रतिम कामगिरीसाठी द डान्स लिजंड ऑफ इंडिया या पुरस्काराने गौरविण्यातही आले. 2015 मध्ये मॉरिशस येथे झालेल्या मराठी दिनाच्यावेळी देखील लॉफीने व त्याच्या ग्रुपने नृत्याविष्कार दाखवले होते. लॉफीच्या या कामगिरीची अनेक प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी दखल घेतली आहे. तामिळ सिनेसृष्टीत मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवणार असल्याची भावना लॉफीने व्यक्त केली आहे. नृत्यासह अभिनयात हुशार असलेला मुंबईचा हा हरहुन्नरी कलाकार आता तामिळ सिनेसृष्टीतही धमाका करणार आहे. या सिनेमाचे नाव नाडा असे असून राघवन थंबी हे याचे दिग्दर्शन करणार आहेत. लॉफी यात प्रमुख भूमिकेत असून लवकरच याचं शूटिंग सुरू होईल. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments