Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लता मंगेशकर : लता दीदींना भेटायला आल्या आशा भोसले, बाहेर येऊन म्हणाल्या…

Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (22:40 IST)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्येत खालावली आहे. त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
आपल्या मोठ्या बहिणीची तब्येत खालावलेली बघताच आशा भोसले यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.
यानंतर पत्रकारांशी बोलताना लतीदीदींची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
त्या म्हणाल्या, "लतादीदींसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. आम्हीही प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे."
 
लतादीदींच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी नेतेमंडळीही ब्रीच कँडी रुग्णालयात जात आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल रुग्णालयात पोहोचले आहेत.
लता मंगेशकर यांच्यावर 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 
लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्येच असून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं लतादीदींवर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे.
 
लतादीदींच्या तब्येतीचे सतत निरीक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते.
दरम्यान, लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत कोणतीही अफवा पसरू नये यासाठी त्यांच्या तब्येतीची माहिती उपचार करणारे डॉक्टर माध्यमांना सतत देत आहेत. लता मंगेशकर यांचे वय सध्या 92 वर्षे आहे.
जानेवारी महिन्यात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांना ऊत आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. तसंच कुटुंबीयांनीही अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.
 
राज ठाकरेंनी घेतली भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. लतादीदींच्या कुटुंबीयांसोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली.
 
लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले.
 
सोशल मीडियावरून प्रार्थना
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले भाजप नेते संबित पात्रा यांनीही लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
गायिका पौशाली साहू यांनी काही वर्षांपूर्वी वसंत पंचमीला लता मंगेशकर यांचा काढलेला एक फोटो शेअर करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
संगीताची देवी सरस्वती देवीची प्रार्थना करत असून आपल्याला त्यांच्या आवाजाचा आशीर्वाद मिळाला असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
प्रसिद्ध व्यावसायिक तहसीन पुनावाला यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.
 
हेमा ते लता
मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव हेमा होतं. मात्र,वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचं पात्र साकारलं.
 
तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे आणि अशाप्रकारे 'लता' हे नाव त्यांना मिळालं.
त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
 
त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
 
लतादीदी त्यांच्या प्रवासाविषयी सांगताना एकदा म्हणाल्या होत्या, "मीच स्वतःला घडवलं आहे. लढायचं कसं हे मी शिकले. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मात्र, मला जे मिळालं ते मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं."

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

पुढील लेख
Show comments