Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र

Webdunia
गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (18:16 IST)
'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. “खेळू झिम्मा गं.…” हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली आहे. हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे.  त्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंड ला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे.  या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

क्राइम पेट्रोलमध्ये अनुप सोनी परतला: 26 हत्यांचे प्रकरण तुम्हाला खिळवून ठेवणार

दुखापतीनंतरही अभिनेता सलमान खानने केले सिकंदरचे गाणे बम बम बोले शूट

कन्नड अभिनेत्री रान्या राव सोने तस्करी प्रकरणात मोठा खुलासा, हॉटेल मालकाला अटक

अभिनेत्री काजोलने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सोडणार का? नवीन होस्टच्या नावावर सोशल मीडियामध्ये चर्चा

सर्व पहा

नवीन

सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटातील 'बम बम भोले' हे गाणे रिलीज होताच हिट झाले

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण: आदित्य ठाकरेंना अटक होणार का? वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक आज त्यांचा ५९ वा वाढदिवस साजरा करीत आहे

संत एकनाथांची समाधी श्री क्षेत्र पैठण

प्रार्थनांना फळ मिळाले, सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनावर आर माधवनने व्यक्त केला आनंद

पुढील लेख
Show comments