Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूषण, रिया, सायली झाले 'मनमौजी'

Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (12:16 IST)
लॉकडाऊनच्या काळात इतर विषयांची चर्चा होत असतानाच आणखीन एक चर्चेचा विषय बनला होता. तो म्हणजे 'मनमौजी' चित्रपटाचा. जेव्हापासून गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची सोशल मीडियावर अधिकृत घोषणा केली तेव्हापासूनच खरंतर या चर्चेला उधाण आले होते. यापूर्वी गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने 'गुलाबजाम', 'लॉस्ट अँड फाउंड' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली असल्याने 'मनमौजी'मध्येही काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार, याची सर्वांनाच खात्री आहे. त्यात चित्रपटातील स्टारकास्ट विषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता यावरूनही पडदा उठला आहे. 
'मनमौजी'मध्ये मराठी सिनेसृष्टीतील 'हँडसम हंक' भूषण पाटील, रॅम्पवर आपल्या फॅशनचा जलवा दाखवणारी, शास्त्रीय नृत्यांगना, अभिनेत्री रिया नलावडे आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सर्वांनीच आपल्या अप्रतिम अभिनयाने स्वत:ची एक छबी निर्माण केली आहे. एकंदरच हा एक रोमँटिक सिनेमा असल्याचे कळतेय.
 
प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटाचे निर्माता विनोद मलगेवार असून चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन शितल शेट्टी यांनी केले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांच्या गाण्यांना अमितराज यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाच्या डिओपीची धुरा प्रसाद भेंडे यांनी सांभाळली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांना काहीतरी चांगले आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार हे नक्की ! गोल्डन गेट मोशन पिक्चर्स 'मनमौजी' सोबतच प्रेक्षकांसाठी येत्या आगामी वर्षांत चित्रपटांचा धमाका घेऊन येणार आहे. त्यापैकीच एक चित्रपट 'फौजदार'. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर या चित्रपटाचे टिझर पोस्टर झळकले होते. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments