rashifal-2026

गुलशन देवय्या मांडणार मराठीत 'डाव'

Webdunia
मराठी चित्रपटाचा विषय आणि प्रसिद्धी लक्षात घेता, बॉलीवूडकरांच्या नजरा मराठी सिनेसृष्टीकडे वळलेल्या दिसून येत आहे. दिवसेंदिवस मराठी चित्रपटांची प्रगती वाढत असल्याकारणामुळे अनेक हिंदी कलाकारांनी या मायमराठीत नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे, रसिकांनी देखील त्याला लगेच आपलेसे केले असल्यामुळे, बॉलीवूडकरांचा मराठी चित्रपटातील कल वाढला आहे. 
 
हिंदीत विशेष नाव आणि प्रसिद्धी मिळून देखील, मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकरांच्या यादीत गुलशन देवय्या या अभिनेत्याचे नाव नव्याने दाखल होत आहे. राम लीला,  शैतान,  तसेच हंटर या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा हा अभिनेता लवकरच 'डाव' या मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
 
मूळच्या बंगळुरूचा असणाऱ्या गुलशनने या सिनेमासाठी महिनाभर मराठीचे धडे गिरवून घेतले असल्याचे समजते. याद्दल सांगताना गुलशनने सांगितले की, 'यापूर्वी हंटर या सिनेमात मी मराठीमध्ये काही एक-दोन वाक्य बोललो असेल, पण त्यामुळे मला मराठी बोलता येते असे नव्हते. मात्र, आगामी 'डाव' या मराठी सिनेमासाठी मला अस्सलखीत मराठी बोलणे गरजेचे होते, शिवाय या सिनेमाची कथा मला खूप आवडली होती, त्यामुळे भाषेच्या समस्येमुळे चित्रपट नाकारण्याची रिस्क मी घेतली नाही, त्यापेक्षा महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे मला योग्य वाटले. अर्थात मुंबईतील मराठी वातावरणात मी राहिलो असल्यामुळे, हि भाषा अवगत होण्यास जास्त वेळ लागला नाही. आता मी चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो' . 
 
आतापर्यंत बॉलीवूडच्या अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती करणाऱ्या ऑडबॉल मोशन पिक्चर्स प्रस्तुत  'डाव' हा पहिलाच मराठी सिनेमा असून कनिश्क वर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा द्विभाषेमध्ये हा सिनेमा चित्रित झाला असल्यामुळे, तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. टॉनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या सिनेमाचे निर्माते आहेत. हिंदीत विशेष कामगिरी बजावणारा गुलशन मराठीत काय 'डाव' मांडतोय हे लवकरच कळेल.
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

New Year 2026 परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेली ही ठिकाणे आहे सकारात्मकतेचा भौगोलिक स्रोत

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

बिग बॉस मराठी' सीझन 6 चा प्रोमो रिलीज, होस्ट रितेश देशमुखने त्याच्या स्टाईलने जिंकले मन

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील लेख
Show comments